आणि चिंटू थांबला . . . . . . . . . . अजूनही आठवतो तो काळा दिवस ज्याच्या उगवण्याने, सर्वांची सकाळ प्रसन्न करणारा चिंटू अचानक निःशब्द, अन एकाकी झाला. ११ जूनची ती सकाळ, अचानक प्रभाकरचा फोन येतो काय आणि त्यानंतर विचारांच्या ही पलीकडे असे एका मागोमाग एक प्रसंग घडतात काय ? सारेच अविश्वसनीय होते. पोटदुखीने अत्यंत त्रस्त झाल्याने प्रभाकरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याच्या मामेभावाने युरॉलॉजिची ट्रीटमेंट त्याला दिली. संध्याकाळी बरे वाटल्याने तो घरीही आला पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. परत त्रास सुरु झाल्याने त्याला लगेच दुसऱ्या दिवशी ऍडमिट केले. तेव्हा त्याला पॅरलिसिसचा अटॅक आला. स्क्यानिंग वैगरे करून पाहिल्यावर मेंदूमध्ये काही क्लॉट्स असल्याचे समजले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रभाकर ब्रेन हॅमरेज होऊन गेला. ११ ते १३ जून हे ३ दिवस प्रभाकर, मी आणि आमचा चिंटू परिवार यांच्यासाठी अतिशय दुःखद आणि भविष्याला कलाटणी देणारे ठरले. २२ वर्षांच्या या अतूट मैत्री मध्ये अखेर काळानेच व्यत्यय आणला. हा धक्का मी आणि आम...
Comments
Post a Comment