Skip to main content

Posts

तेव्हा दोघीनांही

तेव्हा दोघीनांही ताकीद होती उंबरठा न ओलांडण्याची फक्त तू चामड्याची म्हणून उंबरठ्या आत न येण्याची आणि मी कातड्याची म्हणून बाहेर न जाण्याची आता काळ बदललाय तू ही  बदललीस मी ही बदलले . तू उबरठ्या आत येउ लागलीस अन मी उबरठ्या बाहेर जाऊ लागले वाटलं खूप काही बदलेल अखेर चामडं चामडंच राहिलं आणि कातडं कातडंच जेव्हा आदळले ते शब्द पायातली वहाण पायातच बरी !
Recent posts

aani chintu thambla

आणि चिंटू थांबला  . . . . . . . . . . अजूनही आठवतो तो काळा दिवस ज्याच्या उगवण्याने, सर्वांची सकाळ प्रसन्न करणारा चिंटू अचानक निःशब्द, अन एकाकी  झाला. ११ जूनची ती सकाळ, अचानक प्रभाकरचा फोन येतो काय आणि त्यानंतर विचारांच्या ही पलीकडे असे एका मागोमाग एक प्रसंग घडतात काय ? सारेच  अविश्वसनीय होते. पोटदुखीने अत्यंत त्रस्त झाल्याने प्रभाकरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्याच्या मामेभावाने युरॉलॉजिची ट्रीटमेंट त्याला दिली. संध्याकाळी बरे वाटल्याने तो घरीही आला पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. परत त्रास सुरु झाल्याने त्याला लगेच दुसऱ्या दिवशी ऍडमिट केले. तेव्हा  त्याला पॅरलिसिसचा अटॅक आला. स्क्यानिंग वैगरे करून पाहिल्यावर मेंदूमध्ये काही क्लॉट्स असल्याचे समजले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रभाकर ब्रेन हॅमरेज होऊन गेला. ११ ते १३ जून हे ३ दिवस प्रभाकर, मी आणि आमचा चिंटू परिवार यांच्यासाठी अतिशय दुःखद आणि भविष्याला कलाटणी देणारे ठरले. २२ वर्षांच्या या अतूट मैत्री मध्ये अखेर काळानेच व्यत्यय आणला. हा धक्का मी आणि आम...

Dusari Baju

दुसरी बाजू   लेखक - हृषीकेश जोशी  छाप आणि काटा असा खेळ लहानपणी आपण प्रत्येकाने कधी ना कधी निर्णय घेताना खेळलेला असेलच. हा प्रसंग तेव्हाच  उद्भवतो जेव्हा दोनही व्यक्तींना आपलेच मुद्दे योग्य आहेत असं वाटतं असत. आणि कोणीही मागे हटायला तयार नसत. मग अशावेळी नाणं टाकून येईल तो कौल स्वीकारून पुढं जायचं आपण मान्य करतो. त्यावेळी आपण निवडतो की तुझा छापा की माझा काटा म्हणजे त्या नाण्याला दोनही बाजू आहेत हे आपण मान्य करत असतो. आणि नाणं उंच फेकल्यावर जी बाजू येईल तेही आपण नकळत का होईना मान्य करतो. लहानपणी गंमत म्हणून खेळाला जाणारा हा खेळ मोठे होता होता आपण सहज विसरून जातो आणि तितक्याच सहजपणे नाण्याची दुसरी बाजू असते हे देखील विसरून जातो. प्रत्येक निर्णयाच्या वेळी हा खेळ खेळणे हे योग्य नसते काही निर्णय मोठे असतात, पण नाण्याची दुसरी बाजू ही मात्र आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे , हेच  आपल्याला  ' दुसरी बाजू ' या पुस्तकात हृषीकेश जोशी यांनी खूप छान सविस्तर सांगितले आहे. हृषीकेश जोशी हे एक कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत.  यलो , पोस्टर बॉईज...